स्व गृह योजना

"फक्त एक प्रकल्प नाही, ही आहे एक योजना"

"सर्वांसाठी गृहनिर्माण" या राष्ट्रीय धोरणाला अनुसरून पूजा ग्रुपच्या वतीने ' स्व गृह योजना ' ही नवीन संकल्पना साकारण्यात येत आहे. या योजने अंतर्गत सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात पायाभूत सुविधा असलेले त्यांचे हक्काचे घर बांधून देणे हाच उद्देश आहे.

"स्व गृह" म्हणजे तुमचे स्वतःचे घर, ज्याला तुमच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.

आम्ही जाणतो की ' तुमचे घर ' हीच तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, आणि म्हणूनच ' स्वतःच्या घराचे ' तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत.

श्री. पारस ओसवाल

संस्थापक

(पूजा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स)

 • 'पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' हे कोल्हापूरातील बांधकाम क्षेत्रामधील विश्वसनीय नाव आहे.

 • बांधकाम आणि विकास क्षेत्रातील 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पूजा बिल्डर्सने ' भक्ती पूजा नगर ' , ' हरि पूजा पुरम ' ,' पद्म पूजा पूरम ' यासारखे यशस्वी प्रकल्प कोल्हापूरात साकारले आहेत.

 • बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल कुठेही तडजोड न करता सतत ग्राहक सेवेसाठी तत्परतेने कार्यरत असणाऱ्या पूजा बिल्डर्स व डेव्हलपर्सने नवीन कल्पना आणि संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.

 • पूजा बिल्डर्स व डेव्हलपर्सचे संस्थापक श्री. पारस ओसवालजी हे व्यवसायाबरोबरच अनेक सामाजिक कार्यांसाठी सक्रियपणे काम करीत असतात.

 • आपत्ती व्यवस्थापन असो ,दुष्काळ मुक्त महाराष्ट्र असो किंवा मेडिकल कॅम्पसचे आयोजन असो, श्री. पारस ओसवालजींनी नेहमीच अशा सामाजीक उपक्रमांसाठी योगदान दिले आहे.

 • सर्वसामान्यांना ' स्वतःचे घर ' मिळावे याच हेतूने आता पारसजींनी ' स्व गृह योजना ' ही संकल्पना पुढे आणली आहे. या गृहनिर्माण उपक्रमा अंतर्गत परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .

फक्त ग्राहक नाही, भागीदार

आत्तापर्यंत बांधकाम व्यवसायिक हे गुंतवणूकदारांशी , जमीन मालकांशी व इतर बांधकाम व्यावसायिकांशी भागीदारी करून नफा मिळवत होते.

पण या प्रथेला छेद देऊन आम्ही ग्राहकालाच ' स्व गृह योजने ' मध्ये भागीदार म्हणून सहभागी करून घेत आहोत.

' स्व गृह योजने ' अंतर्गत कोणताही प्रकल्प सुरु करण्याआधी आम्ही थेट ग्राहकांशीच संवाद साधून त्यांच्या गरजा नेमक्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

याचबरोबर गृह खरेदीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे , गृहकर्जासाठी बँकांकडून सहाय्य व गृहकर्जावर शासनातर्फे मिळणारी सबसिडी मिळण्यास ग्राहकांना मदत करणे यासाठीही आम्ही कार्यरत असणार आहोत .

इथे भागीदारी म्हणजे पूर्ण पारदर्शकता , विश्वासार्हता तसेच घर बांधताना दर्जाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही ही खात्री आम्ही ग्राहकांना देऊ इच्छितो.

प्रक्रिया

 • 1. वास्तविक मागणी सर्वेक्षण

  ग्राहकांचे बजेट किती आहे , घराचे अपेक्षित क्षेत्रफळ काय आहे व कुठल्या लोकेशनला (प्रभाग) प्राधान्य दिले जाईल इ. सर्व माहिती एकत्रित करून त्याप्रमाणे ग्राहकांना घरे बांधून दिली जातील.
 • 2. बांधकाम

  सर्वेक्षणानुसार ज्या प्रभागात जास्त मागणी आहे तिथे प्रकल्प सुरु केला जाईल. सुरूवातीला आमच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनींवर प्रकल्प तयार केले जातील.पण ग्राहकांना जर स्वतःच्या जमिनीवर घर बांधून हवे असल्यास आम्ही ते संयुक्तपणे बांधून देऊ.
 • 3. घराचे हस्तांतरण

  आमचा प्रयत्न हाच असेल की कोणताही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून ग्राहकांना त्यांच्या ' स्व गृहाचा ' ताबा देणे.

फायदे

बांधकामाची गुणवत्ता

' स्व गृह योजने ' अंतर्गत ग्राहकांना मिळणारी घरे ही त्यांच्या बजेटनुसार देण्यात येणार असली तरी बांधकामाच्या दर्जाप्रती कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

जलद गतीने अंमलबजावणी

अभियंते, आर्किटेक्ट्स आणि कंत्राटदार यांच्या मदतीने लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करणे , हेच आमचे ध्येय असेल.

' क्लीअर ' प्रॉपर्टीज

' स्व गृह योजने ' तील प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मालमत्ता या सर्व कायदेशीर बाबी तपासूनच घेतल्या जातील.

रेरा नोंदणीकृत प्रकल्प

सर्व प्रकल्प ' रेरा ' अंतर्गत नोंदणी झालेलेच असतील.

योजनेत सहभागी व्हा

'स्व गृह योजना' हे सामाजिक-अर्थशास्त्राचे एक उदाहरण आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न आहे.

या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास सहयोग करून आम्ही त्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करत आहोत.

आम्ही गृहनिर्माण क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना - बिल्डर्स, आर्किटेक्ट्स व जमिन मालक - आमच्या मिशनमध्ये येऊन आपल्याबरोबर सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.

आम्ही सहयोगासाठी तत्पर आहोत

आगामी प्रकल्प

प्रकल्पांबद्दल अधिक जाणून घ्या

प्रश्न

' स्व गृह योजना ' ही पूजा बिल्डर्स व डेव्हलपर्स यांची महत्वकांक्षी गृहनिर्माण योजना आहे. या योजनेमध्ये " सर्वांसाठी घर " हे एकच ध्येय ठेऊन राष्ट्रीय मिशनला हातभार लावणे हा हेतू आहे. वीज, पाणी व स्वच्छता या मुलभूत सुविधांसह बांधकामाच्या दर्जाशी कुठेही तडजोड न करता ग्राहकांच्या बजेटनुसार घर बांधून देणे ही संकल्पना आहे.

जिथे आम्हाला एका स्थानासाठी 50 पेक्षा अधिक मागणी प्राप्त होते, आम्ही एक प्रकल्प घेऊन जाऊ. पहिला प्रकल्प कदमवाडी, कोल्हापूर येथे सुरु आहे.

भारताचे सर्व वैयक्तिक प्रौढ नागरिक.

संपर्क साधा

संपर्क माहिती